ठाणे जिल्हा स्कुल स्पोर्टस् असोसिएशनच्या टेबल टेनिस स्पर्धेत वसंत विहार शाळेच्या खेळाडूंचं घवघवीत यश

ठाणे जिल्हा स्कुल स्पोर्टस् असोसिएशनने आयोजित केलेल्या टेबल टेनिस स्पर्धेत वसंत विहार शाळेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत जिल्ह्यातील एकुण २५ शाळांनी भाग घेतला होता तर १६४ खेळाडू विविध गटात सहभागी झाले होते. स्पर्धेतील मानाचे ८ वी ते १० वी चे सांघिक आणि वैयक्तिक गटाचे विजेतेपद मुली आणि मुले ह्या दोनही गटात वसंत विहार शाळेने स्वत:कडे राखून स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व मिळवले.
वैयक्तिक स्पर्धेत पहिली ते चौथीच्या मुलींच्या गटात हिरानंदानी स्कूलची प्रिशा मलिक हिला प्रथम तर वसंत विहार स्कूलची गार्गी कानिटकरला द्वितीय क्रमांक मिळाला. पाचवी ते सातवीच्या मुलींच्या गटात वसंत विहार शाळेची अनुग्रहा पिशारोडी हिला प्रथम तर वसंत विहार शाळेचीच तनिशा गोडबोले हिला द्वितीय क्रमांक मिळाला. पहिली ते चौथीच्या मुलांच्या गटात ऑल सेंट हायस्कूलच्या वेद कुलकर्णीला प्रथम तर हिरानंदानी स्कूलच्या आरव केनियाला द्वितीय तर पाचवी ते सातवीच्या मुलांच्या गटात सरस्वती राबोडीच्या मयुरेश सावंतला प्रथम तर वसंतविहार स्कूलच्या विहान गावंडला द्वितीय क्रमांक मिळाला.
आठवी ते दहावीच्या मुलींच्या गटात वसंतविहार स्कूलच्या अनुष्का पाटीलनं प्रथम तर याच शाळेच्या सिया भोसलेनं द्वितीय क्रमांक पटकावला. आठवी ते दहावीच्या मुलांच्या गटात वसंत विहार स्कूलच्या नीव रांभियानं प्रथम तर ऑल सेंट हायस्कूलच्या हर्षित सोनावणेनं द्वितीय क्रमांक पटकावला. सांघिक स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवीच्या मुली आणि मुलं या दोन्ही गटात वसंत विहार स्कूलने विजेतेपद पटकावलं तर आठवी ते दहावीच्या मुलं आणि मुलींच्या गटात वसंत विहार स्कूलने प्रथम तर हिरानंदानी स्कूलने द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत वसंत विहारचा नीव रांभिया आणि सरस्वती इंग्लिश माध्यम शाळेचा मयुरेष सावंत या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरले. आपल्या चतुरस्त्र खेळाचे दर्शन घडवत सर्व उपस्थितांची दाद मिळवली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading