मिझेल-रूबेला लसीकरण मोहिमेचा ठाण्यात शुभारंभ

ठाणे महापालिका क्षेत्रात आजपासून मिझेल-रूबेला लसीकरण मोहिमेस सुरूवात झाली असून सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल येथे महापालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्या हस्ते या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. महापालिका क्षेत्रातील सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल, सेंट जॉन बापटिस्ट स्कूल, सेंट झेवियर्स, सह्याद्री विद्यालय, साधना विद्यालय, पोतदार स्कूल, परमहंस विद्यालय, वेद विद्यालय अशा विविध शाळांतील २३ हजार ६५९ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. या मोहिमेसाठी महापालिकेनं ५ लाख ८२ हजार ३४९ मुला-मुलींना लस देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. ९९९ शाळांमध्ये ३ लाख ७७ हजार ५२४ मुला-मुलींना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरीत ३५ ते ४० टक्के लाभार्थींचे गोवर लसीकरण, अंगणवाडी केंद्र आणि नियमित लसीकरण केंद्र येथे लसीकरण करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading