मिझेल-रूबेला लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करण्याकरिता रॅलीचं आयोजन

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मिझेल-रूबेला लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करण्याकरिता काल एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांच्या हस्ते या रॅलीला ध्वज दाखवून या रॅलीची सुरूवात करण्यात आली. या रॅलीमध्ये मीनाताई ठाकरे परिचारिका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, ज्ञानसाधना महाविद्यालय, बी. एन. बांदोडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. माझ्या नव-याची बायको फेम राधिका अर्थात अभिनेत्री अनिता दातेही या जनजागृतीपर रॅलीत सहभागी झाल्या होत्या. ही रॅली महापालिका मुख्यालय, अल्मेडा रस्ता, शिवसमर्थ शाळा, राम गणेश गडकरी रंगायतन, सेंट जॉन बापटिस्ट हायस्कूल, रंगो बापूजी चौक मार्गे वाडीया हॉस्पीटल येथे विसर्जित झाली. रंगो बापूजी चौकात मिझेल-रूबेला लसीकरणाबाबत मीनाताई ठाकरे परिचारिका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केलं. ९ महिने ते १५ वयोगटातील मुला-मुलींचे या मोहिमेअंतर्गत लसीकरण करावं, एकच सुई मिझेल-रूबेला आजाराला दूर नेई, मिझेल-रूबेलाचा होऊ नये बाळावर वार यासाठी वापरायचे आहे लसीकरणाचे हत्यार असे संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आले. ५ आठवडे ही मोहिम चालणार आहे. न्यूमोनिया, अतिसार, मेंदूज्वर आदि आजारांचे प्रमाण या लसीकरणामुळे कमी करता येतं म्हणून लसीकरण करावं असं आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.

 

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading