माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाण्यामध्ये काल करण्यात आलेल्या शक्ती प्रदर्शनात मिनाक्षी शिंदे यांचा हिरीरीने पुढाकार होता. आनंदाश्रम ते शक्तीस्थळापर्यंत शिंदे यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समवेत त्या पुढे होत्या. त्यांच्या या पक्षविरोधी कृतीबाबत पक्षानं त्यांची हकालपट्टी केली असल्याचं शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading