ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीनं जून अखेरीस ७४ कोटी ४५ लाखांची विक्रमी कर वसुली केली आहे. तर २९ जून या एका दिवसात या विभागानं १२ कोटी १३ लाखांची वसुली केली आहे. गेल्यावर्षी या विभागानं ५१ कोटी रूपयांची करवसुली केली होती. रोमा बिल्डर्स म्हणजे हिरानंदानी बिल्डर्सनं एकरकमी १२ कोटी ९३ लाखांचा कर भरणा एका दिवसात केला आहे. आत्तापर्यंत या विभागातर्फे ३४ कोटी ४५ लाखांची करवसुली करण्यात आली आहे. १ कोटी अथवा त्यापेक्षा अधिक रक्कमेच्या करदात्यास पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं.