ठाणे शहरात मुसळधार पावसाने ६ ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना

शहरामध्ये सकाळी साडेआठपासून दुपारी ३ वाजेपर्यंतच्या ६ तासात १५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ठाणे शहरामध्ये गेल्या गुरूवारपासून पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचणं, झाडं पडणं अशा घटना रोज घडत आहेत. आजही दिव्याच्या काही भागात पाणी साचलं होतं तर मिलिंद मिरा सोसायटी, ज्युपिटर सोसायटी, अपेक्षा हॉस्पीटल, सिंचन भवन, श्री माँ बालनिकेतन स्कूल, गुरव चाळ अशा ६ ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्या. वेधशाळेनं आजही ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading