महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांना यशदा संस्थेच्या वतीनं प्रशिक्षण

महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांना शारिरीक आणि व्यक्तीमत्व विकासासोबतच त्यांनी सुयोग्य आर्थिक नियोजन करून शिस्तबध्द जीवन जगावे याकरिता यशदा संस्थेच्या वतीनं ३ दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलं. सुरक्षा विभाग सक्षम बनवण्यासाठी सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकी ५० सुरक्षा रक्षकांच्या ४ तुकड्यांना तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणामुळं या विभागातील नवीन कर्मचा-यांना राज्य शासन आणि महापालिकेचे नियम, सेवाशर्ती आणि कर्तव्याची माहिती देण्यात आली. सुरक्षा अधिकारी थोरवे यांनी सर्व नवीन कर्मचा-यांना सुरक्षा म्हणजे काय, त्याचे प्रकार, सुरक्षेची साधनं, त्यांचे प्रकार, ती वापरण्याची पध्दत तसंच सुरक्षा रक्षकांची कर्तव्यं आदीबाबत मार्गदर्शन केलं. सुरक्षा रक्षकांची शारिरीक आणि मानसिक वाढ चांगली होण्याकरिता महिन्याच्या दुस-या आणि चौथ्या शनिवारी परेडचं आयोजन केलं जात असून या सुरक्षा रक्षकांना मार्शल आर्ट तसंच फायर फायटिंगचंही प्रशिक्षण देण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading