महाराष्ट्र भूषण किताब कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

समाज प्रबोधनकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण किताब दिला जाणार असून या निमित्तानं होणा-या कार्यक्रमाचा आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. खारघर मधील सेंट्रल मैदानाची त्यांनी पाहणी केली. याच मैदानात आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गौरव होणार आहे. या कार्यक्रमास जवळपास 20 लाखांच्या वर श्री सदस्य उपस्थित राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानिमित्तानं तयारीत कोणतीही छकमतरता राहू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: कार्यक्रमस्थळी येत पूर्ण व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हा सोहळा व्यवस्थित आणि दिमाखात पार पडावा म्हणून प्रशासनाला सूचना केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवर बोलणे म्हणजे हास्यास्पद आहे. आर्थिक व्यवस्था ढासळत असताना त्यांनी देशाला पुढे नेले. माणूस डिग्रीने मोठा होत नाही तर कर्माने मोठा होतो असं त्यांनी यावरील वादावर बोलताना सांगितलं. हाथी चले अपनी चाल कुत्ते भोके हजार अशी अवस्था महाविकास आघाडीची  झाली असल्याची टीकाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading