स्त्री शिक्षण, सामाजिक समता, सत्यशोधक विचार रुजविण्यासाठी ज्यांनी आयुष्य खर्च केले अशा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्या दालनात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी समतेचा, शिक्षणाचा ज्यांनी पाया रचला अशा ज्योतिबा फुले यांचे कार्य समाजासाठी मोलाचे योगदान आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी दिला. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि सावित्रीबाई फुले यांच्यासोबत खंबीर उभे राहिल्यामुळे सावित्रीबाई फुले पहिल्या शिक्षिका झाल्या. समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी कार्य केले यांच्या कामातून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी केले.