नौपाड्यात महावितरणच्या विद्युत केबलला आग

नौपाड्यातील महावितरणच्या विद्युत केबलला आणि जवळच असलेल्या झाडाच्या बुंध्याला आज मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली होती. मध्यरात्री दीडच्या दरम्यान हा प्रकार घडला. नौपाड्यातील जिजाऊ उद्यानासमोरच्या महावितरणच्या विद्युत केबलला आग लागल्याची तक्रार आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि महावितरणच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग नियंत्रणात आणली.  महावितरणच्या केबलला आणि जवळच असलेल्या झाडाच्या बुंध्याला ही आग लागली होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग पूर्णपणे विझवली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading