महापौरांना धमकी देणा-याला खंडणी विरोधी पथकाकडून अटक

महापौर मिनाक्षी शिंदे यांना दूरध्वनीवरून धमकी देणा-या वसीम मुल्ला नावाच्या व्यक्तीस खंडणी विरोधी पथकानं ताब्यात घेतलं आहे. दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचं सांगून दोन दिवसापूर्वी त्यानं महापौरांना धमकी दिली होती. महापौरांना ज्या दूरध्वनीवरून फोन करण्यात आला होता त्या मोबाईलचं सीमकार्ड मुंब्र्यातील व्यक्तीचं असल्याचं समोर आलं आहे. सध्या याप्रकरणी तपास सुरू असून पोलीस गुप्तता बाळगत असल्याचं सांगितलं जातं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading