महापालिका नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विकासकांवर कारवाई करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महानगरपालिकेच्या आरोग्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर त्वरीत कारवाई करून प्रकल्पाला स्थगिती द्यावी. तसेच इतरही आरोग्य विषयक खबरदारी घेऊन ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये एच३एन२ या आजाराचा प्रसार होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश महानगरपालिकेला द्यावे अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ठाण्यामध्ये कोरोना आणि एच ३ एन २ अश्या दोन्हीं आजारांची लागण झालेल्या एका वृध्दाचा मृत्यु झाला. त्यामुळे शहरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यामध्ये उपचाराधिन कोरोना रूग्णांची संख्या ३०६ इतकी असून त्यापैकी तब्बल २०६ रूग्ण हे ठाणे महानगरपालिका हद्दीतील आहेत. देशामध्ये आणि राज्यामध्ये एच३एन२ या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी केंद्रातील आणि राज्यातील आरोग्य यंत्रणा खबरदारी घेत असताना ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये अनेक विकास प्रकल्प चालू आहेत. या विकास प्रकल्पांमध्ये कामे चालू असताना कामगारांची आरोग्य विषयक कोणतीही खबरदारी घेत नसल्याचे आढळून येत आहे. शहरातील सर्व विकासक महानगरपालिकेच्या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून येत आहे. एच३एन२ चा ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये इतर महानगरपालिकांच्या दृष्टीने जास्त प्रमाणात प्रसार होण्यामागे हे एक मोठे कारण असल्याचे नागरिकांचे मत आहे. तरी महानगरपालिकेच्या नियमांचे उल्लंघन करणार्या अशा प्रकल्पांना स्थगिती द्यावी. तसेच इतरही आरोग्य विषयक खबरदारी घेऊन ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये एच३एन२ या आजाराचा प्रसार होणार नाही याची काळजी महानगरपालिकेने घेण्यासंदर्भात संबंधितांना निदेश द्यावेत. अशी मागणी प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading