प्राच्याविद्या अभ्यास संस्थेत अव्दितीय मंदिरांच्या फोटोंचे आणि गाणाऱ्या दगडांचे  प्रदर्शन

गाणारे दगड बोलणारे पाषाण महाराष्ट्रातील वैविध्य आणि अव्दितीय मंदिरांच्या फोटोंचे आणि गाणाऱ्या दगडांचे  प्रदर्शन प्राच्याविद्या अभ्यास संस्थेत आयांजित करण्यात आलं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये मंदिरांचे  आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे किंबहुना मंदिरा भोवती आपल्या सर्व परंपरा ग्रामव्यवस्था जोडलेल्या आहेत. महाराष्ट्रात प्राचीन काळापासून मंदिर कला ही विकसित झालेली आहे केवळ देवदर्शन हा हेतू न ठेवता देवदर्शन  यात्रा करताना त्या मंदिरांमागील स्थापनेचा विचार, स्थापत्यशास्त्र , त्यामागील विज्ञान आणि परंपरा यांची ओळख करून घेणे हे कोणालाही आवडेल.
अशाच एका ध्येयाने प्रेरित होऊन पुण्यातील मोरेश्वर कुंटे आणि त्यांच्या पत्नी विजया कुंटे यांनी वानप्रस्थाश्रम स्वीकारून 1991 ते 2007 या कालावधीमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यातील जवळपास 17 हजाराहून अधिक मंदिरांना प्रत्यक्ष भेट दिली आणि त्याची छायाचित्रे, माहिती संकलन, आठवणी असा ज्ञानाचा एक खजिना विकसित केला. त्यांनी जिल्हा जिल्ह्यात आपल्या बजाज एम फिफ्टी या दुचाकी वर फिरून सर्व माहिती मिळवली. त्याची पुस्तके केली जेणेकरून भविष्यामध्ये प्रत्येक शहराला आपला वारसा काय आहे याचा एक संदर्भ मिळेल. अशा सर्व दुर्मिळ फोटोंचे आणि ऐतिहासिक दगडांचे  प्रदर्शन प्राच्य विद्या अभ्यास संस्थेत आयोजित करण्यात आले आहे. मोरेश्वर कुंटे यांचे चिरंजीव प्रभाकर कुंटे आपल्या पालकांचे हे अफाट कार्य पुढे चालवत आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉक्टर विजय बेडेकर, यांच्या हस्ते झाले. अश्या माहितीच्या संकलनासाठी अथक परिश्रम घेऊन आपल्या जीवनाचा वेळ पैसा खर्च करून एका विशिष्ट ध्येयाने झपाटलेल्या कुंटे दाम्पत्यांचे त्यांनी आभार मानले आणि युवकांनी स्थानिक ठिकाणी पुढे येऊन हा विषय आत्मसात करावा आणि हा वसा पुढे चालवावा असे आवाहन केले. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते काही विशिष्ट प्रकारचे दगड पाण्यात सोडून ते तरंगताना पाहायला मिळाले. हे प्रदर्शन उद्या पर्यंत पाहता येईल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading