महापालिका आयुक्तांची कोविड रूमला भेट

कोविडचा सामना करण्यासाठी शहरात प्रभावी उपाययोजना सुरू असून कोविडच्या अनुषंगाने आवश्यक आणि मुलभूत माहिती आणि सूचना देण्यासाठी हजुरी येथील इंटीग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड वॉर रूमला महापालिका आयुक्तांनी भेट देऊन रूग्णांच्या तक्रारींचं तात्काळ निवारण करण्याचे आदेश दिले. कोविड विषयी योग्य ती माहिती मिळावी म्हणून महापालिका मुख्यालयात कोविड वॉर रूम कार्यान्वित करण्यात आली होती. पण ही वॉर रूम अद्ययावत आणि प्रशस्त जागेत असावी याकरिता हजुरी येथे हलवण्यात आली आहे. या अद्ययावत वॉर रूमला महापालिका आयुक्तांनी भेट देऊन माहिती घेतली. या वॉररूमच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण, शासनाच्या विभागाशी समन्वय, मंत्रालयातील कोविड रूमशी समन्वय, रूग्णांना विविध गोष्टींसाठी मार्गदर्शन, रूग्णवाहिका, शववाहिका देण्याच्या अनुषंगानं मार्गदर्शन केलं जात आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading