जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार २७७ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे १ हजार २७७ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात २७ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सद्यस्थितीत १६ हजार ६६९ कोरोना ग्रस्त उपचार घेत असून आत्तापर्यंत ४ हजार ६१६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाख ६१ हजार ४९१ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. एकूण १ लाख ८२ हजार ७७६ पॉझिटिव्ह रूग्ण आत्तापर्यंत नोंदवले गेले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ३ हजार ७१२ रूग्ण उपचार घेत असून ३३ हजार ८९१ कोरोना रूग्ण बरे झाले तर १ हजार २९ जणांचा मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ३ हजार ४४४ रूग्ण उपचार घेत असून ३९ हजार ७६३ बरे झाले तर ८५७ जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ३ हजार ६४८ रूग्ण असून ३४ हजार ३७ बरे झाले तर ७८३ दगावले आहेत. मीरा-भाईंदरमध्ये १ हजार ८७७ रूग्ण उपचार घेत असून १६ हजार ९४६ कोरोनातून बरे झाले तर ५९८ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये ६६२ रूग्ण असून ८ हजार ४५५ बरे झाले तर ३०९ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये ३३७ रूग्ण उपचार घेत असून ४ हजार ५८० कोरोनातून बरे झाले तर ३१३ जणं दगावले. अंबरनाथमध्ये ५२० रूग्ण प्रत्यक्ष उपचार घेत असून ५ हजार ७७४ बरे झाले तर २३६ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये ४९२ रूग्ण असून ५ हजार ८८२ कोरोनामुक्त झाले तर ७७ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये १ हजार ९७७ रूग्ण असून १२ हजार १६३ बरे झाले तर ४१४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading