मलंगगडासह आसपासच्या गावांचा पाणीप्रश्न लवकरच निकाली निघणार

मलंगगडासह आसपासच्या गावांचा पाणीप्रश्न लवकरच निकाली निघणार आहे. पर्यटन, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्व असलेल्या श्री क्षेत्र मलंगगडावर पायाभूतसुविधा उभारण्याचा चंग कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी बांधला आहे. त्यातील एक महत्वाचा टप्पा दृष्टीक्षेपात आहे. मलंग गडावर यापूर्वी कधीही पाणी पुरवठा योजना नव्हती. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने लवकरच मलंगगडाला स्वतंत्र आणि स्वतःची अशी पाणी पुरवठा योजना मिळणार आहे. त्यासाठी तब्बल साडे १२ कोटींच्या प्रस्तावा मंजुरी मिळाली असून त्यात पाणी उचल यंत्रणा, जलकुंभ, वितरण व्यवस्थेतील जलवाहिन्या, बंधारे आणि एमआयडीसीचे पाणी याचा समावेश करण्यात आला आहे. मलंगगडासोबतच आसपासच्या गावांनाही यामुळे पहिल्यांदाच पाणी पुरवठा योजनेचा लाभ होणार आहे. खासदार शिंदे यांनी मलंगगडावर स्वतः स्वतंत्र पाणी पुरवठा योजना उभारण्याची संकल्पना जिल्हा परिषेदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे मांडली होती. या संकल्पनेला लवकरच मूर्त स्वरूप येणार असून त्यासाठी तब्बल साडे १२ कोटींच्या निधीला मंजुरीदेण्यात आली आहे. या योजनेत मलंगगडावर स्वतंत्र पाणी पुरवठा योजना उभारली जाणार आहे. या योजनेसाठी ९कोटींची तरतूद करण्यात आली आहे. उसाटणे येथून जाणाऱ्या एमआयडीसीच्या जलवाहिनीतून चार किलोमीटरवर या ठिकाणी पाणी नेण्याचा प्रस्ताव आहे. पाणी उचलून पंपाद्वारे गडावर उभारल्या जाणाऱ्या जलकुंभात नेले जाईल. तेथून जलवाहिन्यांच्या माध्यमातून ते पाणी घराघरात पोहोचवले जाणार आहे. एकूण साडे १२ कोटी रूपयांच्या माध्यमातून मंलग गडावर पहिल्यांदाच पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading