मंत्रालयात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून ८ लाखांची फसवणूक

मंत्रालयात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून तिघांनी सुमारे ८ लाख ३० हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुहास रसाळ हे टीएमटीमध्ये वाहक म्हणून काम करतात. रसाळ यांना मंत्रालयात तर त्यांच्या बहिणीस मुलुंड तहसिलदार कार्यालयात नोकरी लावून देतो असं सांगून विद्या पवार, दिनेश पवार आणि हेमा पवार अशा तिघांनी त्यांच्याकडून रोख, धनादेश, पेटीएम आणि गूगल पे द्वारे पैसे उकळले. रसाळ यांच्याकडून त्या तिघांनी ७ लाख १० हजार रूपये घेतले तसंच विद्या पवार यांनी उधारीचा बहाणा करून रसाळ यांच्याकडून १ लाख २० हजार रूपये घेतले. त्यानंतर सेवेत रूजू करण्यासाठी प्रशासन विभागाचं बनावट पत्र रसाळ यांना देऊन त्यांची फसवणूक केली. याबाबत रसाळ यांनी विचारणा केली असता त्यांनाच धमकी देण्यात आली. याप्रकरणी पोलीसांकडे तक्रार केली तर एक रूपयाही देणार नाही अशी धमकी रसाळ यांना देण्यात आल्यामुळं या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading