कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीसांनी अट्टल चोरांच्या आवळल्या मुसक्या

कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीसांनी अट्टल चोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. कल्याणमधील प्रेम ऑटो पेट्रोल पंपाचे कर्मचारी प्रदीप सिंग हे पेट्रोल पंपावर जमा झालेली १२ लाख ४० हजारांची रोकड आणि सव्वा तीन लाखांचे धनादेश बँकेत भरण्यासाठी जात असताना विजयबाग येथील पदपथावर तीन आरोपींनी प्रदीप सिंगला लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याच्याकडील रक्कम लंपास केली. याप्रकरणी आरोपींबाबत काहीही माहिती नसताना गोपनीय माहितीच्या आधारे पोलीसांनी सचिन शिरोडकर, सोमनाथ खंडागळे, नितीन पवार, रूपेश म्हात्रे, रोहिदास सुरवसे, वैभव भास्कर अशा ६ जणांना अटक करून त्यांच्याकडून ११ लाख ६० हजार ९० रूपयांची रोकड हस्तगत करण्यात यश मिळवलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading