भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे कपिल पाटील विजयी

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांनी काँग्रेसवर विजय मिळवत ही जागा पुन्हा आपल्याकडे कायम राखण्यात यश मिळवलं आहे. कपिल पाटील यांच्याविरोधात शिवसेनेमध्ये बरीच नाराजी होती. शिवसेनेच्या बाळा म्हात्रे यांनी बंडखोरीही केली होती. पण कशाचाही फटका न बसता कपिल पाटील या मतदारसंघातून १ लाख ५६ हजार ३२९ इतक्या मतांनी निवडून आले. कपिल पाटील यांना ५ लाख २३ हजार ५८३ तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे सुरेश टावरे यांना ३ लाख ६७ हजार २५४ मतं मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या अरूण सावंत यांना ५१ हजार ४५५ मिळाली. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणा-या नितेश जाधव यांना २० हजार ६९७ मतं मिळाली तर यापैकी कोणीही नाही म्हणजे नोटांचा वापर १६ हजार ३९७ मतदारांनी केला. गेल्या निवडणुकीत कपिल पाटील १ लाख ९ हजार ४५० मतांनी निवडून आले होते. तर यंदा कपिल पाटील गतवेळच्या तुलनेत ४७ हजाराहून अधिक मतांनी निवडून आले आहेत. या मतदारसंघात एकूण झालेल्या मतदानापैकी ५२ टक्के मतदान कपिल पाटील यांना झालं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading