पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांना मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राखण्यात यश

पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांनी विजय संपादन करून हा मतदारसंघ शिवसेनेकडे कायम राखण्यात यश मिळवलं आहे.शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे आला होता. मात्र मतदारसंघ शिवसेनेकडे येऊनही शिवसेनेनं भारतीय जनता पक्षात असलेल्या राजेंद्र गावित यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली होती. काल झालेल्या मतमोजणीत राजेंद्र गावित यांना ५ लाख ८० हजार ४७९ मतं मिळाली तर बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना ४ लाख ९१ हजार ५९६ मतं मिळाली. त्यामुळं राजेंद्र गावित ८८ हजार ८८३ मतांनी पुन्हा निवडून आले. या मतदारसंघात एकूण १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. या मतदारसंघात यापैकी कोणीही नाही म्हणजे नोटाचा २९ हजार ४७९ मतदारांनी वापर केला. या मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांनी घेतलेली मतं आणि नोटाचा मोठ्या प्रमाणात झालेल्या वापरामुळे राजेंद्र गावित यांचा विजय सुकर झाला. या मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानापैकी ४८ टक्के मतं राजेंद्र गावित यांना मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading