बालरोग विभागाच्या स्थापनेस कल्याण-डोंबिवली महापालिकेला खासदार श्रीकांत शिंदेंकडून सव्वा कोटी रूपये निधी

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयात बालरोग विभागासाठी सव्वा कोटी रूपये निधी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या खासदार निधीतून देण्याबाबत जिल्हाधिका-यांची भेट घेतली. देशासह राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता तज्ञांनी व्यक्त केली असून लहान मुलांवर त्याचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भविष्यात तशी आवश्यकता उद्भवल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता लहान मुलांसाठी हाय फ्लो यंत्रणा तसंच ज्या मुलांना गहन वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते त्यांना समर्पित नवजात आईसीयू घटकांमध्ये ठेवले जाते. यापैकी प्रत्येक एनआयसीयू युनिट आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असते, बाळांना एनआयसीयू काळजी घ्यावी लागेल किंवा याची काळजी घेण्यासाठी आरोग्य व्यावसायिकांनी त्यांची लक्षणे, शारीरिक आरोग्य इत्यादींचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता खासदार शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रांतर्गत येणाऱ्या शास्त्रीनगर रुग्णालयात अशा प्रकारचे सुसज्ज असे पेडिएट्रिक युनिट निर्माण करण्याकरिता
४० ते ५० खाटांचा बालरोग विभाग, १० खाटांचा नवजात अतिदक्षता विभाग, १० खाटांचा बालरोग अतिदक्षता विभाग, १० बालरोग वेंटिलेटर, बालरोग उपकरणे, प्राणवायू वाहिन्या अशा प्रकारचे सुसज्ज युनिट तयार करण्याचे निर्देश शिंदे यांनी महापालिकेस दिले.
हा बालरोग अतिदक्षता विभाग कोरोनाची साथ संपल्यानंतरही कार्यान्वित राहील, जेणेकरून कल्याण डोंबिवली महापालिकेस कायमस्वरुपी बालरोग विभाग असलेले रुग्णालय मिळेल आणि याचा फायदा जवळील शहरातील आणि खेड्यांमधील लहान बालकांना देखील होईल या अनुषंगाने यासाठी लागणारा १ कोटी २५ लक्ष इतका निधी श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या खासदार निधीतून देण्याकरिता जिल्हाधिका-यांची भेट घेतली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading