प्रशांत नगर येथील एसआरए प्रकल्पातील रहिवाशांना दिवाळीपर्यंत घरं मिळणार.

शहरात अनेक एसआरएचे प्रकल्प विविध कारणांनी रखडले असून आमदार संजय केळकर यांनी एसआरएच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जाब विचारला. गेली दोन वर्षे बंद पडलेल्या प्रशांत नगरच्या प्रकल्पाबाबतही अधिकारी आणि विकासक यांना धारेवर धरल्यानंतर रहिवाशांना दिवाळीपर्यंत घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले. शहरात झोपडपट्टी पुनर्विकासासाठी एसआरए योजना सुरू आहे, मात्र विविध कारणांनी हे प्रकल्प रखडले आहेत. रहिवाशांनी घरे रिकामी केल्यानंतर विकासक आधी विक्रीच्या घरांच्या इमारतीचे बांधकाम सुरु करतात, त्यामुळे रहिवाशांना त्यांची घरे वर्षानुवर्षे मिळत नाहीत. अशात विकासकाकडून घरभाडे वेळेवर मिळत नसल्याने रहिवासी देशोधडीला लागतात. हे प्रकल्प तातडीने मार्गी लागून रहिवाशांना त्यांची हक्काची घरे मिळावीत अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी एसआरएच्या कार्यालयात अधिकाऱ्यांकडे केली. केळकर यांनी प्रशांत नगर येथील दोन वर्षे रखडलेल्या एसआरए प्रकल्पातील रहिवाशांची व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडत जाब विचारला. पुढील वर्षी मार्चपर्यंत या रहिवाशांना घरांचा ताबा देण्याचे मान्य करण्यात आले तसेच दिवाळीपर्यंत एक इमारत पूर्ण होईल असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading