पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी ठाण्यातून कोळी समाज बांधव त्यांच्या पारंपरिक वेषात मुंबईकडे रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी ठाण्यातून कोळी समाज बांधव त्यांच्या पारंपरिक वेषात मुंबईकडे रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौ-यावर असून त्यांचा हा दौरा म्हणजे शक्ती प्रदर्शनच ठरलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षातर्फे जास्तीत जास्त कार्यकर्ते उपस्थित रहावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ठाण्यातूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी ठाणे पूर्व भागातून कोळी समाज बांधव आपल्या पारंपरिक वेषात मुंबईला रवाना झाले. आमदार संजय केळकरही कोळी बांधवांची पारंपरिक टोपी घालून त्यांच्या सहभागी झाले होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading