कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत प्रशिक्षण

कोकण विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 30 जानेवारी रोजी मतदान होत असून 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीसंदर्भातील प्रशिक्षण नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज ठाणे जिल्हा नियोजन सभागृहात देण्यात आले. ही निवडणूक कोकण विभागातील 98 मतदान केंद्रावर होत आहे. मतमोजणी नेरुळ येथील आगरी कोळी भवन येथे पार पडणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया मतपत्रिका आणि बॅलेट नुसार होत असल्याने पसंती क्रमानुसार मतमोजणी कशा प्रकारे करायची याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागीय उपआयुक्त मनोज रानडे यांनी यावेळी मतमोजणी प्रक्रियेसंबंधी माहिती दिली. शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रक्रियेत मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले कोकण विभागातील सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मतपेट्या उघडणे, मतमोजणीची प्रत्यक्ष पद्धती आणि टप्पे समजावून सांगण्यात आले. प्रत्यक्ष मतपत्रिका मोजणे, पसंतीक्रमानुसार उमेदवारनिहाय वाटप करणे आणि प्रत्यक्ष निकाल तयार करणे याबाबत यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून डमी साहित्याद्वारे प्रात्यक्षिक करुन घेण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading