सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे देण्याचा निर्णय ऐतिहासिक – महापौर

खारटन रोड येथील लफाट चाळीत राहणाऱ्या 191 सफाई कर्मचाऱ्यांना पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप अंतर्गत विकसित करण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये मालकी हक्काची घरे देण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत येथील सफाई कर्मचाऱ्यांनी सदनिका रिकामी केली असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या पगारातील घरभाडे आणि सेवाशुल्क माफ करण्यात येणार असल्याचे पत्र आज महापौर नरेश म्हस्के यांनी प्रातिनिधीक स्वरुपात 10 कर्मचाऱ्यांना देण्यात आले. सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरे देण्याचा निर्णय हा ऐतिहासिक असल्याचे महापौरांनी यावेळी नमूद केले. खारटन रोड येथील महापालिकेच्या मालकी हक्क असलेल्या जागेवर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप अंतर्गत पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या ठिकाणी राहत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या पगारातून घरभाडे कपात करण्यात येत होते.‍ परंतु महासभेने याबाबत एकमताने निर्णय घेवून कर्मचाऱ्यांच्या पगारातील घरभाडे कपात न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सद्यस्थितीत नवीन इमारतीच्या बांधणीसाठी 100 सफाई कर्मचाऱ्यांनी घरे रिकामी केली असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या पगारातील घरभाडे भत्ता आणि सेवाशुल्क कपात न करण्याबाबतचे पत्र आज महापौरांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांना देण्यात आले. तसेच जसजसे या लफाट चाळीतील घरे सफाई कर्मचारी रिकामी करतील त्या प्रमाणे त्यांचेही घरभाडे कपात केले जाणार नाही.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading