पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी येथील रेल्वेचा पूल 2021 पर्यंत होणार खुला

ठाणे कोपरी रेल्वे पुल एप्रिल २०२१ पर्यंत खुला होईल अषी माहिता खा.राजन विचारे यांनी दिली. ऐन गर्दीच्या वेळी सकाळी आणि संध्याकाळी हायवे पूर्व द्रुतगतीमहामार्गावरील कोपरी रेल्वे
येथेअरुंद पुलाच्या सुरू असलेल्या कामामुळेवाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. हा त्रास कमी व्हावा आणि या पुलाचे काम लवकरातलवकर मार्गी लागावे यासाठी खासदार राजन
विचारे यांनी या पुलाच्या कामासंदर्भात असणाऱ्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत पाहणी केली.या पुलाच्या दोन्ही बाजूस दोन-दोन लेन नवीन बांधण्यात येणार आहेत. त्यामध्ये पूर्व द्रुतगती
महामार्गावरील मुंबई आणि ठाण्याच्या दिशेस असणाऱ्या लेनचे काम एमएमआर डी ए मार्फत सुरू आहे. तर रेल्वे पुलावरील काम रेल्वे मार्फत सुरू आहे. तसेच खासदार राजन विचारे यांनी या
पुलाच्या रुंदीकरणाच्या कामात बाधित 7 वृक्षांचे स्थलांतरण कधी होणार याची विचारणा केली असता ही सात झाडे येत्या सोमवारी स्थलांतरित करण्यात येतील. असे आश्वासन खा विचारे यांना
देण्यात आले. या स्थलांतरित केलेल्या वृक्षांच्या जागेवर रुंदीकरणाचे काम एमएमआरडीएमार्फत सुरू असल्याचे पाहणीत निदर्शनास आले. त्यानंतर खासदार राजन विचारे यांनी या रेल्वे पुलाच्या
बांधकामात हायवे पूर्व द्रुतगती महामार्गामध्ये नागरिकांना आपली वाहने वळसा मारून घेऊन यावे लागते. तसेच या ठिकाणी नवीन रेल्वेस्थानकाची ही निर्मिती होणार आहे. या दृष्टिकोनातून
ज्ञानसाधना कॉलेज ते भास्कर कॉलनी मार्गावर अंडरपास चे काम कधी सुरू होणार. याची विचारणा केली असता हा दोन लेन चा अंडरपास सर्विस रोड पेक्षा तीन ते चार मीटर उंचीचा असणार
असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांना देण्यात आली. या मार्गातून जड अवजड वाहने सुद्धा जाऊ शकतील असे नियोजनाचे काम सुरू आहे. या मार्गाचे काम रेल्वे जुना पूल तोडून नवीन
पुलाचे काम सुरू होईल त्यावेळी या मार्गाचे काम सुरू करता येईल असे असे अधिकाऱ्यांनी खासदार राजन विचारे यांना सांगण्यात आले. ठाणे-मुलुंड दरम्यान रेल्वे लाईनचा पूल हा
1958सालीसार्वजनिक बांधकाम विभागाकडून ४मार्गिकेचा बांधण्यात आला होता 1995 नंतर पूर्व द्रुतगती महामार्गाचे काम दोन्ही बाजूस ८- मार्गीकेचे करण्यात आले. परंतु हा रेल्वे पूल४
मार्गिकेचा असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडीला नागरिकांनासामना करावा लागत होता. या पुलाच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागमार्फत 2002 पासून रेल्वेकडे पाठपुरावा करीत
होते. परंतु निधीअभावी याचे काम रेल्वे मार्फत पूर्ण करता आले नाही.आता या पुलाचे काम एप्रिल 2021 पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन खासदार राजन विचारे यांना देण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading