दिवा – पनवेल मार्गावर लोकल सेवा सुरु करण्याची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मागणी

दिवा – पनवेल मार्गावरील वाढत्या लोकसंख्येमुळे दररोज हजारोच्या संख्येने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या मार्गावर लोकल सेवा सुरु करण्याची आग्रही मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी
अधिवेशनादरम्यान शून्य प्रहर काळात केली. दिवा – पनवेल रेल्वेमार्ग हा रोह्या पर्यंत विस्तारित झाला असून पेण पर्यंत रेल्वे सेवा ही सुरु झाली आहे. अलिबाग येथील राष्ट्रीय केमिकल आणि
फर्टिलाइजर्स पर्यंत दिवा – पनवेल लोकलसेवा सुरु करण्याचे आश्वासन यापुर्वी रहिवाशांना देण्यात आले होते. मुंबई – पनवेल हार्बर मार्गावर तसेच ठाणे – पनवेल मार्गावर ही लोकल सेवा सुरु
झाली परंतु पनवेल ला जोडणारा दातिवली, आगासन, निळजे, तळोजा, नवडे आणि कळंबोली हा महत्वाचा मार्ग लोकल सेवेसाठी मात्र मध्य रेल्वे प्रशासनाकडून अजूनही दुर्लक्षित राहिला आहे या
मार्गावरुन कोकण रेल्वे ही जात असून लवकरात लवकर दिवा पनवेल या मार्गावर लोकल सेवा सरु करण्यात यावी, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मा. रेल्वेमंत्री श्री.पियुष गोयल
यांच्याकडे केली. वारंवार होत असलेल्या रेल्वे अपघातांसंदर्भात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. गर्दीमुळे आत शिरता न आल्याने दरवाजात उभ्या असलेल्या तरुणीचा गर्दीमध्ये
धक्का लागून कोपर – दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला असून दरवर्षी रेल्वे अपघातामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्या प्रवाशांची संख्या साधारणपणे ३००० एवढी असून तेवढीच संख्या
ही जखमी प्रवांशाची आहे, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले. रेल्वे प्रशासनाने याकडे गंभीरतेने बघण्याची गरज असून रेल्वे अपघात होऊ नये, यासाठी तातडीने पाऊल उचलत
ठोस उपाय योजना केल्या पाहिजेत, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी मा. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading