ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाने आपल्या 84 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अनेक नवीन अभ्यासक्रम

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळाने आपल्या 84 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अनेक नवीन अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे. काल एका पत्रकार परिषदेत विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष
विजय बेडेकर यांनी ही घोषणा केली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चे अनेक ऑनलाईन अभ्यासक्रम आता विद्या प्रसारक मंडळाच्या विविध शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून
देण्यात आले आहे. यासाठी विद्या प्रसारक मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामध्ये सामंजस्य करार झाल्याची माहिती डॉक्टर बेडेकर यांनी यावेळी दिली. विद्या प्रसारक मंडळाच्या
वेळणेश्‍वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयावर अकरा महिन्यांचा एक नवीन आणि उच्च दर्जाचा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आला
आहे. त्याचप्रमाणे विद्या प्रसारक मंडळाने स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु केल आहे. विविध शासकीय सेवांसाठी स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात, अशा स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने
प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांची या स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेण्याच्या उद्देशाने हे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात आल्याचे डॉक्टर बेडेकर यांनी सांगितले. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध
स्पर्धा परीक्षांसाठी या केंद्राद्वारे विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाणार आहे. या परीक्षा केंद्रांमध्ये महाविद्यालयाच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेता येईल असे डॉक्टर विजय बेडेकर यांनी
सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading