पालिकेनं महिन्यातील एक दिवस महिला लसीकरणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीनंतरच दिल्याचा समिशा मार्कंडेंचा दावा

पालिकेनं महिन्यातील एक दिवस महिला लसीकरणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीनंतरच दिल्याचा दावा समिशा मार्कंडे यांनी केला आहे. ठाणे शहर महिला सेनेच्या वतीने महापालिका आयुक्तांना महिलांसाठी लसीकरणाकरिता एक दिवस राखून ठेवावा असं निवेदन देण्यात आलं होतं. त्यानंतर महापौरांनी याचे श्रेय लाटण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवडयात एक दिवस महिलांसाठी लसीकरण मोहिम अशी घोषणा केली आहे. ही घोषणा म्हणजे मनसेच्या महिला सेनेच्या निवेदनाचे श्रेय लाटण्याचा उद्योग आहे. या घोषणेचे श्रेय फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला सेनेचेच आहे. श्रेयाचे राजकारण महापौरांना लखलाभ असे उद्गार समीशा मार्कंडे यांनी काढले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading