पायवाटा आणि गटारे दुरुस्तीच्या खर्चाची चौकशी करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

शहरातील पायवाटा आणि गटारे दुरुस्ती हा एक भ्रष्टाचाराचा भाग असून गेल्या चार महिन्यांपासून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमधील पूरक यादीतील पायवाटा आणि गटारे दुरुस्तीच्या खर्चाची चौकशी करावी अशी मागणी धर्मराज्य पक्षानं केली आहे. स्मार्ट सिटी अशी ओळख असलेल्या ठाणे शहरात आजघडीला किती गटारे आणि पायवाटा शिल्लक आहेत, हा खरा संशोधनाचा विषय आहे. अशा पायवाटांची, गटारांची नोंद ठाणे महापालिकेकडे आहे का? पायवाटा आणि गटारे दुरुस्तीचे विषय अगदी आयत्यावेळी महासभेत कसे येतात? महासभेत कोणत्या प्रकारचे प्रस्ताव असावेत, याबाबत महापालिकेचे नेमके धोरण काय आहे? पूरक विषयांसाठी महाराष्ट्र महापालिका अधिनियम कायदा किंवा शासन आदेशात काही विशेष तरतुदी आहेत का? असे अनेक प्रश्न धर्मराज्य पक्षानं उपस्थित केले आहेत. शहरातील पायवाटा या खासगी मालमत्तेतील आहेत, की महापालिकेच्या मालकी हक्काच्या आहेत, हे देखील प्रशासनाने स्पष्ट करावे अशी मागणीही धर्मराज्य पक्षानं केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading