इंदौर येथे झालेल्या वेस्टर्न इंडिया पॉवरलिफ्टींग स्पर्धेत ठाण्याच्या सुष्मिता देशमुखनं सुवर्णपदकाबरोबरच स्ट्राँग वुमन ऑफ वेस्टर्न इंडियाचा किताबही पटकावला. अलिकडेच इंदौर येथे झालेल्या वेस्टर्न इंडिया सिनियर पॉवरलिफ्टींग स्पर्धेत २२ किलो वजनी गटात सुष्मितानं सुवर्णपदक पटकावलं. सुष्मिता देशमुख विटावा भागात राहतात. सुष्मिता कल्याणच्या कारभारी जिम्नॅशियम क्रीडा मंडळात सराव करतात.