जीवरक्षक साधनांच्या वापराचे आपदा मित्रांना अंबरनाथमध्ये प्रशिक्षण

ठाणे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आयोजित अंबरनाथ येथे सुरू असलेल्या आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात आपदा मित्रांना पूरस्थिती सारखी नैसर्गिक आपत्ती परिस्थितीत जीवरक्षक साधनांच्या उपयोग कसा करायचे याचे अंबरनाथ येथील धरणात देण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष, नवी दिल्लीतील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थपन प्राधिकरण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने अंबरनाथ मध्ये हे प्रशिक्षण सुरू आहे. महसूल, पोलीस, अग्निशमन, उल्हासनगर, कल्याण आणि अंबरनाथ येथील महाविद्यालयातील विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय कॅडेट कोअरचे विद्यार्थी असे एकूण १२५ जण या प्रशिक्षण मध्ये सहभागी झाले आहेत. आपत्ती काळात तातडीने मदत कार्य सुरू करण्यासाठी जिल्ह्यात ५०० आपदा मित्र तयार करण्यात येत आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात १०० आपदा मित्रांना ठाण्यात प्रशिक्षण देण्यात आले होते. आता आपदा मित्रांच्या दुसऱ्या फळीचे प्रशिक्षण अंबरनाथ येथे सुरु आहे. या प्रशिक्षणाचा दहावा दिवस होता. पूरपरिस्थितीमध्ये जीवरक्षक साधनाच्या वापराचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले. बोटीच्या माध्यमातून बुडणाऱ्यांना कसे वाचवायचे, पोटात पाणी गेल्यास काय उपाययोजना करायचे आदींचे प्रशिक्षण देण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading