पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मै भी चौकीदार कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे मोजकेच नगरसेवक उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मै भी हूँ चौकीदार याअंतर्गत देशभरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची संपर्क साधला. मात्र या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे मोजकेच नगरसेवक उपस्थित होते. दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विविध भागातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी देशात कसा विकास केला गेला यावर भर दिला. हा कार्यक्रम ठाण्यातील ज्ञानराज सभागृहातही प्रक्षेपित करण्यात आला होता. या कार्यक्रमास ठाणे लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार राजन विचारे, आमदार संजय केळकर, प्रताप सरनाईक, शहराध्यक्ष संदीप लेले यांच्यासह शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र भारतीय जनता पक्षाच्या अगदीच मोजक्याच नगरसेवकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळं पालकमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्यानंतरही भारतीय जनता पक्षाचे काही नगरसेवक अजूनही नाराज आहेत का अशी चर्चा ऐकायला मिळत होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading