नौपाडा पोलीसांनी सोन्या-चांदीच्या दुकानातून दागिने चोरण्याप्रकरणी दोन महिलांना अटक केली आहे. नौपाड्यातील एका सोन्या-चांदीच्या दुकानातून या दोन महिलांनी सुमारे सव्वा तीन लाखाहून अधिक किंमतीचे दागिने चोरले होते. सोन्या-चांदीच्या दुकानातील विक्रेत्याचं लक्ष वेधून त्यांनी ही चोरी केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली. या दोन महिलांच्या चौकशीत त्यांनी मुंबईतही दीड लाख रूपयांहून अधिक किंमतीचे दागिने चोरल्याची माहिती दिली. पोलीसांनी त्यांच्याकडून जवळपास ४ लाख ९२ हजार रूपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. पुणे-कोल्हापूरमध्येही या दोन महिलांनी अशाप्रकारे चोरी केल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.