नारायण राणे यांच्या विरोधातील आंदोलनादरम्यानच्या घोषणेमुळे महापौर अडचणीत

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधातील आंदोलना दरम्यानच्या घोषणेमुळे महापौर आज चांगलेच अडचणीत आले. मुख्यमंत्र्यांबद्दल काढलेल्या अनुद्गारामुळे नारायण राणे आणि शिवसेनेत सध्या जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. ठाण्यातही या विरोधात आंदोलन करत असताना महापौरांनी केलेल्या चुकीच्या घोषणेमुळं महापौर चांगलेच अडचणीत आले. पांचपाखाडी येथील तीनटाकी येथे नारायण राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना नारायण राणे अंगार है असं म्हटले आणि त्यांच्याबरोबरच्या शिवसैनिकांनी बाकी सब भंगार है अशी घोषणा दिली. ही बाब लक्षात येताच हा व्हीडीओ व्हायरल करण्यात आला. महापौरांनाही हा व्हीडीओ व्हायरल झाल्याचं लक्षात आलं आणि आता अडचण होऊ शकते हे समजल्यावर आंदोलनाचा धसका घेऊन हा व्हीडीओ खोडसाळपणे तयार करण्यात आल्याचा खुलासा महापौरांनी तातडीनं केला. मात्र व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये महापौरांची घोषणा स्पष्टपणे दिसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading