कलाकारांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचं आयोजन

कलाकारांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचं आयोजन काल करण्यात आलं होतं. अखिल भारातीय मराठी नाट्यपरिषदेची ठाणे शाखा तसेच वाद्यवृंद कलानिधी समिती ठाणे यांच्या मागणीनुसार खासदार राजन विचारे यांच्या पुढाकाराने ठाणे महापालिकेतर्फे ठाण्यातील कलाकारांसाठी विशेष कोरोना लसीकरण सत्राचे आयोजन गडकरी रंगायतन येथे करण्यात आले होते. यामध्ये वाद्यवृंद तसेच नाट्य आणि न्रुत्य क्षेत्रातले कलाकार, तंत्रज्ञ आणि त्यांच्या कुटुंबियांना कोविशिल्ड लस डोस देण्यात आली. ह्या उपक्रमात संस्थेचे सभासद आणि त्यांच्या कुटुंबीयानी नाव नोंदणी केली. या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाला रंगमंच कामगार ह्यांचा सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading