ठाण्यातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये जोरदार वादंग सुरू असून ठाण्यातही भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न करण्यात आला. मुख्यमंत्र्यांबद्दल काढलेल्या अनुद्गारामुळे सध्या शिवसेना आणि नारायण राणेंमध्ये वादंग सुरू असून त्याचे पडसाद ठाण्यातही उमटले. राणे यांच्या प्रतिक्रियेनंतर भारतीय जनता पक्षाच्या विविध कार्यालयांवर हल्ले झाले. नाशिक, पुणे पाठोपाठ ठाण्यातील खोपट कार्यालयावरही हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र हल्ला करून हल्लेखोर पळून गेले. खोपट येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर पोलीसांनी बंदोबस्त ठेवला होता. हल्ला झाल्याचं पाहून पोलीसांनीही हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला पण हल्लेखोर वाहनांवरून पळून गेले. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्या घेऊन कार्यालयाबाहेर येऊन घोषणाबाजी केली. या हल्ल्यानंतर पोलीसांनी पक्षाचं कार्यालय असलेला खोपट रस्ता दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद केला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading