नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली पाचपाखाडीतही वीजबिल विरोधी नारा

ऐन लॉकडाऊनच्या काळातच महावितरणने लागू केलेल्या अन्यायी वीजबिल वाढीविरोधात नगरसेवक नारायण पवार यांच्या नेतृत्वाखाली पाचापाखाडीतही वीजबिल विरोधी नारा करण्यात आला. भाजपाच्या कार्यकर्त्यांबरोबरच शेकडो नागरिकांनी जाहीर पाठिंबा दर्शवून वीज बिले तत्काळ रद्द करण्याची मागणी केली. भारतीय जनता पक्षातर्फे वाढत्या वीजबिलांविरोधात आज शहरातील विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. त्यानुसार नारायण पवार यांनी पाचपाखाडी येथील मुख्य चौकात निदर्शने केली. ऐन लॉकडाऊनच्या काळात लाखो नागरिक घरातच थांबले होते. या काळात सर्वांचा आर्थिक गाडाही थांबला होता. अशा परिस्थितीत वीजबिलांमध्ये वाढ करण्याची महावितरणची हिंमत होते कशी, असा सवाल पवार यांनी केला. वीजबिल दरवाढ तत्काळ मागे घेण्याची मागणी करीत कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading