दिवा शहरात शिवसेनेच्या महाआरतीला ऐतिहासिक प्रतिसाद

दिवा येथे रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोध्या नगरीत श्रीराम प्रभूंचे दर्शन घेऊन शरयू नदीच्या तीरावर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी महाआरती केली. त्याच पार्श्वभूमीवर दिवा  शहराच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी महाआरतीचे आयोजन केले होते.

दिवा शहरातील दातीवली तलावाजवळ संपन्न झालेल्या या महाआरतीला दिवावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारो महिलांनी सामूहिक महाआरतीत सहभाग नोंदवला.

”शिवसेना आणि दिवावासीयांच एक अतूट नातं आहे. दिवा शहराच्या प्रगती आणि समृद्धीसाठी संपन्न झालेल्या महाआरतीत प्रचंड संख्येने सहभागी होऊन दिवावासीयांनी ते दाखवून दिले. नागरिकांनी, विशेषतः आमच्या महिला वर्गानी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल दिवा शहर अधिकारी, युवती सेनेच्या दिवा शहर अधिकारी साक्षी रमाकांत मढवी यांनी आभार व्यक्त केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading