माजी नगरसेविका सिंधूताई गोटे यांचे निधन

मुंब्रा येथील माजी नगरसेविका सिंधूताई गोटे यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. दिवंगत दै. लोकनायकचे संपादक  कुंदन गोटे यांच्या त्या पत्नी होत्या. सिंधूताई गोटे नगरसेविका असतांना त्यांच्या प्रयत्नांनी प्रभागात  विविध नागरिक उपयुक्त अशी कामे पुर्ण झाली, त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर आज त्यांच्या गावी अंतरवाली दाई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले असुन त्यांच्या पश्चात शुभम, बुध्दभूषण  अशी दोन मुले, सून, नातवंडे, सासू, सासरे, दीर, नणंद असा मोठा आप्तपरिवार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading