ठाण्यात लवकरच मराठा समाजाचे वसतिगृह – पालकमंत्री

ठाण्यात लवकरच मराठा समाजाचे वसतिगृह होईल आणि मराठा समाजाच्या ज्या ज्या मागण्या येतील त्या मी पूर्ण करेन, मी मराठा समाजाचा म्हणून मंत्रालयात बसलेला तुमचा हक्‍काचा माणूस आहे, अशा शब्दात पालकमंत्री मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर आश्वासन मराठा समाजाच्या देशातील १०० मराठा संस्थांचे अखिल मराठा संमेलन ठाण्यात झाले त्यावेळी दिले. युवापिढीला भावी वाटचालीसाठी वक्ते जनरल विजयराव पवार यांनी सैन्यदल, वायुदल, नौदल क्षेत्रातील संधी आणि उज्ज्वल चव्हाण यांनी राज्य आणि केंद्र सरकार रेव्हेन्यू सेवा संधी बद्दल मार्गदर्शन केले तर उद्योजक शिवाजी महाराज शिवाजी द मॅनेजमेंट गुरुचे लेखक प्रा नामदेवराव जाधव यांचे व्याख्यान झाले. उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटविणाऱ्या अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज, गोवा,रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज, मुंबई श्रीवर्धन, म्हसळा मराठा समाज सेवा संस्थांचे कौतुक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जनमेजयराजे भोसले, नितीन देसाई, प्रतापराव जाधव, प्रा. दशरथ सगरे, कै. नीलकांतराव जगदाळे या समाजातील कर्तबगार व्यक्तींबद्दल कृतज्ञता वक्त करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading