जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या इंग्रजी वाङमय मंडळाचं उद्घाटन

पत्रकारांसाठी प्रामाणिकपणा आणि निःपक्षपातीपणा यांबरोबरच आपल्या व्यवसायाप्रती निष्ठा असणे अत्यावश्यक आहे. पत्रकाराने सतत वाचत राहावे आणि शिकण्यासाठी तयार असावे असे विचार पत्रकार आणि माध्यमतज्ज्ञ जी. मोहिउद्दीन जेड्डी यांनी व्यक्त केले. जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या इंग्रजी वाङमय मंडळाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आजच्या जगात पत्रकारीतेच्या क्षेत्रात नवनवीन संधी उपलब्ध झाल्याचे सांगतानाच त्यांनी ‘सत्याप्रती आदर, सुस्पष्टता आणि मानवी संवेदनशीलता’ पत्रकारीतेचे आधारस्तंभ असल्याचे लक्षात आणून दिले. त्यांच्या हस्ते इंग्रजी विभागाच्या ‘फ्रेग्रंस’ या वाङमयीन पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. प्रथम, द्वितिय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपल्यातील कलागुणांचा शोध घ्यावा या उद्देशाने दरवर्षी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमांची सुरूवात साहित्य आणि पत्रकारीता या क्षेत्रातील नामवंत व्यक्तीच्या व्याख्यानाने होते. या वर्षीच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे जेड्डी यांनी या प्रसंगी ‘पत्रकारीता आणि लेखन’ या विषयावर आपले विचार मांडले. भारताच्या चांद्रयान मोहीमेच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा अंक ‘मूनस्ट्रक’ या विषयाला वाहिलेला आहे. या हस्तलिखितातील कविता, लेख आणि इतर साहित्याचे लेखन, संपादन आणि सजावट महाविद्यालयातील इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading