ठाण्यातील सह्याद्री शाळेजवळील नाल्यावरील कावेरी सेतू आकर्षणाचा केंद्रबिंदू

ठाण्यातील सह्याद्री शाळेजवळील नाल्यावरील रस्त्यावर कावेरी सेतू उभारला जात आहे. ब्रिटीशकालीन खुर्च्या, महागडे दिवे, गौतम बुध्दाची प्रतिमा, आकर्षक रंगसंगती असा या सेतूच्या परिसरातील थाट असणार आहे. सकाळ-संध्याकाळ येथे विरंगुळ्यासाठी दोन घटिका बसायला मिळावे अशा उद्देशानं हा सेतू उभारला जात असल्याची माहिती कळवा-मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्राकर परिषदेत दिली. जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून उभारल्या जात असलेल्या कावेरी सेतूमुळे कळव्याला नवी ओळख मिळणार आहे. कळवा स्टेशनला जोडणारा महत्वाचा दुवा म्हणूनही हा सेतू ओळखला जाणार आहे. येथे फेरफटका मारण्यासाठी येणा-यांना झाडांच्या सावलीत पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये गप्पा मारण्याकरिता ब्रिटीशकालीन टेबल खुर्च्या बसवण्यात आल्या आहेत. मागच्या बाजूस भिंतीचा आकार तयार करून त्यावर गौतम बुध्दाची प्रतिमा साकारण्यात आली आहे. सायंकाळच्या वेळी परिसरातील वादक येथे गिटार किंवा व्हायोलिनचे सूर आळवत असतील अशी माहिती आव्हाड यांनी दिली. या ठिकाणच्या नाल्यावरील भिंतीवर या भागातील कलाकारांना रोजच्या रोज आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. नाल्यावर उभारण्यात आलेला हा रस्ता आता विरंगुळ्याचे नवे केंद्र होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading