जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्या आता होणार अधिक स्मार्ट

रंगकाम केलेल्या बोलक्या भिंती, आंतर्बाह्य भिंतीवर केलेली सजावट, आतील भागात असणारी भित्तीपत्रकं, पाण्यापासून ते आसन व्यवस्थेपर्यंत असणा-या दर्जेदार सुविधा, मुलांना खेळण्यासाठी विस्तीर्ण मैदान, बैठे खेळांचं विविध साहित्य असा अत्याधुनिक स्मार्ट साज असणा-या अंगणवाड्या जिल्ह्याच्या आदिवासी भागात उभ्या राहत आहेत. ही माहिती महिला आणि बालकल्याण विकास अधिकारी संतोष भोसले यांनी दिली. लायन्स क्लब जुहूच्या सहकार्यानं जिल्ह्यातील अंगणवाड्यांचा स्मार्ट लूक पहायला मिळणार आहे. भिवंडी, शहापूर, मुरबाड या तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील अशा अंगणवाड्यांचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून हसमुखभाई हे गृहस्थ ११ अंगणवाड्या स्मार्ट करणार आहेत. अशा स्मार्ट अंगणवाड्यांमुळे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होईल तसंच अंगणवाड्यांचा दर्जा उंचावण्यासही मदत होईल असं संतोष भोसले यांनी सांगितलं. जिल्हा परिषदेच्या निधीतून अंगणवाड्यांमध्ये जलशुध्दीकरण यंत्र, सिलिंग फॅन, धान्यकोठी, कारपेट, ग्रीन बोर्ड, घसरगुंडी, डुलता घोडा अशा वस्तूंची तरतूद करण्यात आली आहे. तर लायन्स क्लब तर्फे अंगणवाडीचे रंगकाम, बोलक्या भिंती, छत-भिंतींची दुरूस्ती, इतर डागडुजी, किचन प्लॅटफॉर्म, दरवाजा, खिडक्या दुरूस्ती, आतील भिंतींवर १ फूटाची उंच लादी, लायब्ररी रॅक अशा सुविधा दिल्या जाणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading