ठाण्यातील घंटाळी मार्गावर लवकरच एकेरी वाहतूक

ठाण्यातील घंटाळी मार्गावर लवकरच एकेरी वाहतूक सुरू केली जाणार आहे. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील वाहतूक समस्येसंदर्भात वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांची भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी घंटाळी मार्गावर एकेरी वाहतूक सुरू केली जाणार असल्याची माहिती दिली. विष्णूनगर येथे होणा-या वाहतूक कोंडीबाबत आणि अनधिकृत पार्कींगवर आमदार संजय केळकर यांनी कारवाई करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे अनधिकृतपणे रस्त्यावरून चालणा-या रिक्षांवर देखील कारवाई करण्याची सूचना आमदार संजय केळकर यांनी वाहतूक शाखेच्या उपायुक्तांना केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading