भारतीय चलनातून रद्द करण्यात आलेल्या १ हजार रूपयांच्या २ हजार ३०० नोटा ठाणे गुन्हे शाखेनं केल्या जप्त

भारतीय चलनातून रद्द करण्यात आलेल्या १ हजार रूपयांच्या २ हजार ३०० नोटा म्हणजे २३ लाख रूपये ठाणे गुन्हे शाखेनं जप्त केले आहेत. ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय सरक यांना काही व्यक्ती भारतीय चलनातून रद्द झालेल्या १ हजार रूपयांच्या चलनी नोटा बदली करून घेण्यासाठी कोरम मॉलजवळील सेवारस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलीसांनी कोरम मॉलसमोर सापळा रचून फिरोज अन्सारी या शिक्षकास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पाठीवरील पिशवीमध्ये भारतीय चलनातून रद्द करण्यात आलेल्या १ हजारांच्या २ हजार ३०० नोटा मिळाल्या. भारतीय चलनातून रद्द करण्यात आलेल्या आणि असे चलन घरात ठेवण्यास प्रतिबंध असतानाही बेकायदेशीररित्या या नोटा बाळगल्या म्हणून भारतीय दंडसंहितेनुसार अन्सारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading