ठाण्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इनडोअर जिम्नॅस्टीक सेंटरचं काम अंतिम टप्प्यात – एप्रिलमध्ये होणार लोकार्पण

ठाण्यामध्ये आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून भव्य आणि सुसज्ज असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं इनडोअर जिम्नॅस्टीक सेंटर आणि स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. ठाणे महापालिका प्रभाग क्रमांक ५ मध्ये टाटा समुहाच्या सुविधा भूखंडावर हे जिम्नॅस्टीक सेंटर तयार होत आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी या कामाची पाहणी केली. हे इनडोअर सेंटर उभारण्यासाठी टाटा समुहानं ३८ कोटी रूपये खर्च केले असून त्या बदल्यात महापालिका टाटा समुहाला कन्स्ट्रक्शन टीडीआर देणार आहे. मात्र आतील साधन सामुग्रीचा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे. या जिम्नॅस्टीक सेंटरचे एकूण क्षेत्रफळ ८३ हजार चौरस फूट आहे. या सेंटरचं बांधकाम पूर्ण झालं असून आता अंतर्गत सजावटीचं काम सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असून या सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर जे खेळ खेळले जातात त्याचे प्रशिक्षण येथे दिले जाणार आहे. या सेंटरमध्ये पार्कींग, कॅफेटेरिया, स्वच्छतागृह, म्युझिक रूम, योगा रूम, टीमसाठी रूम, प्रशिक्षकांसाठी जागा, परिक्षकांसाठी रूम अशा सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. या सेंटरमध्ये रिदमिक, इंडिव्हीज्युअल आणि ग्रुप, मायक्रोबॅटीक फ्लोअर एक्सरसाईज, पोमेल हॉर्स, बॅलन्सिंग बिम, थम्बलिंग, हायबार, अनईव्हन बार असे विविध खेळ खेळता येणार आहेत. हे सेंटर बांधताना खेळाडूंचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे हे सेंटर उभारण्यात आलं आहे. आता एप्रिल महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सेंटरचं उद्घाटन करण्याचा मानस असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading