अग्निसुरक्षेच्या दृष्टीनं आनंदनगर येथील सरस्वती विद्यालयामध्ये मॉक ड्रील

देशभरामध्ये शाळांच्या अग्निसुरक्षेच्या दृष्टीनं मॉक ड्रील करण्यात आलं. ठाण्यातही आनंदनगर येथील सरस्वती विद्यालयामध्ये महापालिकेच्या अग्निशन दलानं हे मॉक ड्रील केलं. आग लागल्यानंतर काय करावं, कोणती काळजी घ्यावी याचं प्रात्यक्षिक विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि पालक विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांना देण्यात आले. राज्यातील सर्व शाळांमध्ये फायर ऑडीट बंधनकारक करण्यात आलं आहे. शाळेमध्ये आग लागल्यास या आगीवर कसं नियंत्रण मिळवायचं, कोणाशी संपर्क साधायचा याबाबत प्रशिक्षण देणं बंधनकारक असतं. शाळेमधील अग्निशमन यंत्रणा कशा हाताळाव्यात याचं प्रशिक्षणही महत्वाचं आहे. यामुळे शाळांमधील अशा मॉक ड्रीलना महत्व आहे. २१ जानेवारीला देशभरातील शाळांमध्ये आग विझवण्यासंबंधी मॉक ड्रील केलं जातं. त्यानुसार सरस्वती विद्यालयामध्ये मॉक ड्रील करण्यात आलं. शाळेचे मुख्याध्यापक व्ही. व्ही. ढवळे यांच्या सहकार्यानं बाळकूम अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी गिरिश झडके यांनी मॉक ड्रील करताना विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचा-यांना आग कशी विझवली जाते, अग्निशमन दलाचे कर्मचारी कसे काम करतात, आग विझवण्यासाठी अग्निरोधक यंत्रांचा कसा वापर करावा याची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. यावेळी शाळेतील रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत आग लागली आणि सर्व विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून २ अग्निशमन बंबांच्या सहाय्यानं ही आग विझवण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading