ठाणे शहरातील काही भागात बुधवारी पाणी पुरवठा बंद राहणार

ठाणे शहरातील काही भागात बुधवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

ठाणे महापालिकेच्या वतीने सर्व्हिस रोड,धर्मवीर मार्ग(डी-पॉईंट)या ठिकाणी बीएमसी जलवाहिनीवर जलमाफक बसविणे तसेच हाजूरी येथील रॉ वॉटर पाणी पुरवठा बंद करण्याकरिता क्रॉस कनेक्शनचे काम करण्यासाठी बुधवार सकाळी 9.00 ते गुरुवार सकाळी 9.00 पर्यत शहरातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठ्याचे नियोजन करून बुधवार दिनांक 17 जुलै 2019 रोजी सकाळी 9.00 ते गुरुवार दिनांक 18 जुलै 2019 सकाळी 9.00 पर्यत बंगला वॉटर डिस्ट्रिक्ट मधील नामदेववाडी, पाचपाखाडी, टेकडी परिसर,आराधना, सेंट जॉन स्कूल परिसर तसेच गावदेवी वॉटर डिस्ट्रिक्ट मधीलबी कॅबिन, दादा पाटील वाडी, स्टेशन परिसर,चेंदणी कोळीवाडा,नागसेननगर,महागिरी, राम मारुती रस्त्यावरील एका बाजूचा भाग व जांभळीनाका इत्यादी भागात पाणी पुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्यतो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading