ठाणे महापालिका क्षेत्रासाठी विविध विकासकामांसाठी आता आणखी १५ कोटींचा निधी मंजूर

ठाणे महापालिका क्षेत्रासाठी विविध विकासकामांसाठी आता आणखी १५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. शहरातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाड्या खरेदी करण्याबरोबरच विविध समाजांच्या भवन निर्मिती सारख्या कामांचा यात समावेश आहे.
आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडून शेकडो कोटी रुपयांचे विकास प्रकल्प मंजूर करून घेतले. त्याबाबतचे स्वतंत्र शासन निर्णय प्रसिद्ध झाले आहेत. आता ठाणे शहरातील १३ विकासकामांसाठी आणखी १५ कोटी रुपये सरनाईक यांच्या प्रयत्नातून मंजूर झाले आहेत. ‘महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास’ या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. वर्तकनगर येथील समाज मंदिरासाठी १.२५ कोटी, आनंदनगर नाक्याजवळील ऋतू एनक्लेव्ह शेजारील खुल्या रंगमंचावरील पहिला मजल्याकरिता तसेच रंगमंचा समोरील बाजूस लाद्या लावणे, कुंपन भिंत बांधणे, प्रवेशद्वार उभारणे, विद्युत रोषणाई करणे आणि इतर कामांकरिता १.२५ कोटी, पोखरण रोड नं. २ वरील आर.जी. भुखंडावर सिंधुताई सकपाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्राचे प्रवेशद्वार उभारण्यासाठी २५ लाख, रौनक ग्रुपच्या सुविधा भुखंडावर हिंदी भाषा भवन उभारण्याकरिता १ कोटी, घोडबंदर रोडवरील रौनक ग्रुपच्या सुविधा भुखंडावर दक्षिण भारतीय भवन उभारण्याकरिता १ कोटी, वाघबीळ येथील महाराणा प्रताप भवन उभारण्याकरिता १ कोटी, कासारवडवली येथील सरदार वल्लभभाई पटेल भवन उभारण्याकरिता १ कोटी, ओवळा येथील मैथीली समाज भवन उभारण्याकरिता १ कोटी, कासारवडवली येथील अद्ययावत लायब्ररीकरीता फर्निचर आणि पुस्तकांसाठी २५ लाख, ओवळा येथील बंगाली समाज भवन उभारण्याकरिता १ कोटी निधी मंजूर झाला आहे. कासारवडवली येथील महापालिकेच्या आरोग्य केंद्रासमोरील उद्यानाच्या १५% जागेवर महिला बचत गट भवन उभारण्यासाठी १ कोटी निधी तसेच कासारवडवली येथील ज्येष्ठ नागरिक भवन बांधण्याकरीता १ कोटी निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. तर ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कचरा गोळा करण्यासाठी छोट्या घंटागाड्या खरेदीसाठी १ कोटी निधी मंजूर झाला आहे. या निधीतून किमान १२ पेक्षा अधिक छोट्या घंटागाड्या पालिकेला खरेदी करता येणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading